मूल प्रतिनिधी
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आज (२६ सप्टेंबर )मूलच्या डोनी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, एका मुलाचा पायाचा अंगठा कटला आहे. दोन पुरुषही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या मार्गावर 20 ते 25 प्रवासी आतापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला ठणकावून इशारा दिला आहे की, जर महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवले नाहीत, तर कठोर आंदोलन उभारले जाईल. पक्षाने अधिकाऱ्यांना बेशरमाचे फुल देऊन निष्काळजीपणाची जाणीव करून देण्याचा इशाराही दिला आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही.