राजुरा : पत्रकार असोसिएशन राजुरा द्वारा आयोजित शहरातील नेट सेट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा प्रसंगी राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे बोलत असताना सांगितले की, राजुरा शहरातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेत असून शिक्षक व पालक यांच्या योग्य मार्गदर्शनातून राजुरा शरतील विद्यार्थी राजुरा ते दिल्ली पर्यंत शिक्षणात उड्डाण घेत असल्याने त्यांना दिल्लीतील नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढता आलेख पाहता राजुरा शहर शैक्षणिक केंद्राकडे वाटचाल करीत असून शहरातील नगर परिषदेच्या सरदार वल्लभभाई पटेल अभ्यासिकेचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेण्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेट सेट परीक्षा उत्तीर्ण शुभम बोर्डेवार, अब्दुल कुरेशी, शोएब शेख यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा परिषद सदस्या मेघाताई नलगे, राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अहमद, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यु. बोर्डेवार, जेष्ठ पत्रकार आनंद भेंडे, विनायक देशमुख, आनंद चलाख, सुरेश साळवे, गणेश बेले, मुखरू सेलोटे, श्रीकृष्ण गोरे, फारुख शेख, सागर भटपल्लीवार, साहिल सोळंके, मंगेश बोरकुटे, उमेश मारशेट्टीवार उपस्थित होते.
राजुरा शहरातील शुभम भीमय्या बोर्डेवार यांनी वाणिज्य विषयात सेट परीक्षा सप्टेंबर २०२१ ला तर नेट परीक्षा नोव्हेंबर २०२१ ला पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. लाईफ सायन्स या विषयात सप्टेंबर २०२१ ला अब्दुल मोईन मतीन कुरेशी व शोएब मुजीब शेख हे परिक्षा उत्तीर्ण झाले. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण गोरे यांनी केले तर आभार फारुख शेख यांनी मानले