वरोरा : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी वरोऱ्यातील मधील महाविकास आघाडी एकवटली आहे. शहरातील गांधी चौक परिसरात आज दि. २५ फेब्रुवारी रोजी काँग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भाजपने नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला असून नवाब मलिक यांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. केंद्रातील भाजप विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात आमदार प्रतिभा धानोरकर , शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व राष्ट्रवादीचे नेते मोरेश्वर टेमुर्डे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग आंदोलनात होता.
केंद्र सरकारमधील भाजप सरकार दडपशाही करत असून याविरोधात राज्यात सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. वरोऱ्यातही काँग्रेस , शिवसेना आणि यांच्यासह राष्ट्रावादीने गांधी चौकात आंदोलन केले. जिल्ह्यात ठीकठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिकांनी काही चुकीचं केलेलं नाही. भाजप नेते त्यांना धमकावत आहेत. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेल्याचे काम करत आहे.त्यामुळे भाजपा सूडबुद्धीचे राजकारण करत असून इडी व सीबीआय या प्रशासकीय यंत्रणेला हाताची धरत आघाडी सरकारमधील नेत्यांना खोट्या आरोपात अडकवत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी आंदोलनस्थळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख विलास नेरकर,शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम,बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, राष्ट्रवादी उपजिल्हा प्रमुख अविनाश ढेंगळे, युवक कॉंग्रेस विधानसभा प्रमुख शुभम चिमूरकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख आलेख रठ्ठे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बंडू भोंगाळे , छोटूभाई शेख, प्रदीप बुऱ्हाण, दिनेश यादव, सन्नी गुप्ता, मनोहर स्वामी, प्रमोद काळे, राजू महाजन, बंडू डाखरे, दिनेश मोहारे, चंद्रकांत कुंभारे, भूषण बुरीले,अमित निब्रड,प्रज्वल जानवे ,अतुल नांदे ,राहुल दारुंडे, मंगला पिंपळकर,सुषमा भोयर, अल्का पचारे, रजनी मेश्राम, ज्योत्सना काळे, रंजना परशिवे, सुशिला तेलमोरे,सुनिता नरडे,मोनाली काकडे,जनाबाई पिंपळशेन्डे ,शिल्पा रुयारकर, नंदा गवई, व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला होता.
Podcast: Play in new window | Download