सिरोंचा: महायुतीच्या माध्यमातून विविध लोक कल्याणकारी योजना राबविले जात आहेत.दुर्गम भागातील नागरिकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी बराच वेळ वाया जात असल्याने अनेकजण या योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांनी त्वरित कागदपत्रांची पूर्तता करून लोक कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
रविवार (२२ सप्टेंबर) रोजी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानुर येथील जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,राकॉचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख,येथील सरपंच नीलिमा कारे,उपसरपंच शेखर शेखर गणारपू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,प.स.माजी उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार,वेंकटलक्ष्मी आरवेली, नगरसेवक सतीश भोगे,सतीश राचार्लावार,ओमप्रकाश ताटीतोंडावर, फाजील फाशा,रवी सुलतान,जुगणु शेख,कैलास कोरेत,बालाजी गावडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना नुकतेच महायुतीच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे.बरेज बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे रक्कम देखील जमा करण्यात आले.मात्र,काही बघिनींनी अजून पर्यंत केवायसी केली नाही.त्यामुळे गावपातळीवर काम करणारे सुशिक्षित युवक युवतींनी त्यांना मदत करण्याचे आवाहन देखील मंत्री आत्राम यांनी केले.
दरम्यान झिंगानुर गावात आगमन होताच परिसरातील नागरिकांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे पारंपारिक आदिवासी नृत्याने जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ देखील देण्यात आला.
परिसरातील समस्या सोडविण्याचे निर्देश
सिरोंचा तालुक्यातील झिंगानुरसह आदी गावे अतिदुर्गम भागात असून हा परिसर छत्तीसगड सीमेलगत आहे. या भागातील नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय तालुका मुख्यालयात जाऊन विविध शासकीय कामे करून घेणेही अनेकांना शक्य नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणा याच परिसरात येऊन गोरगरिबांचे काम केले पाहिजे. त्याअनुषंगाने सर्वांनी सज्ज राहून काम करा, एकही लाभार्थी लोक कल्याणकारी योजना पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या.असे निर्देश मंत्री आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जनसंवाद कार्यक्रम संपन्न झाल्यावर मंत्री आत्राम यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी येथील तहसीलदार हमीद सय्यद,नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.