गोंडपिपरी -(सुरज माडूरवार):- गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी घटना चंद्रपुर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात आज घडली आहे. सकमूर गावातील पोलीस पाटील व ईतर दोन नागरिकांवर आज दि.(१७) मंगळवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान प्राणघातक हल्ला झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.त्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी गावकरी करत असून त्यांची समजूत काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.गावकऱ्यांनी पोलिसांच्या कारची हवा सोडली आहे. त्यामुळे पोलिसांना गाडी घेऊन निघणं अवघड झालं आहे.
आरोपी इरफान शेख सकमुर जवळ गुजरी या गावात अवैध दारू विक्री करतो मागील आठ वर्षापासून यांचे कुटुंब ईथे वास्तव्यास आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा लोकांना धमकावल्याचा, मारहाण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इरफान शेखने गणपती मिरवणुकीत शुल्लक कारणावरून नाचताना धक्का लागल्याच्या गोष्टीवरून
तुळशीराम काळे पोलीस पाटील,मोहन तांगडे,विभाकर शेरके यांच्यावर सहकाऱ्यांना घेऊन चाकुने हल्ला केल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.पोलिसांनी दोन आरोपिना ताब्यात घेतले आहे. पण त्याला आमच्या ताब्यात द्या,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. सकमूरवासीयांनी पोलिसांच्या गाडीजवळ गर्दी केली घ्टणास्थळी लाठी धावा वेरूळ स्टेशन येथील पोलिसांचा ताफा आला त्यापैकी दोन गाड्यांच्या काचा संतप्त नागरिकांनी फोडल्या
अटक झालेल्या दोन आरोपींना एसडीपीओ राजुरा साखरे हे आपल्या वाहनांमध्ये घेऊन जात असताना नागरिकांनी त्यांना घेराव घातला गर्दीतून वाहन काढताना एका नागरिकाच्या पायावरून चाक गेल्याने त्याचे पाय तुटके गंभीर जखमी झाला
दोन आरोपींना गावकऱ्यांनी पोलिसांचे वाहन थांबवून मारहाण केली . त्यांची गंभीर स्थिती आहे व जखमी पोलीस पाटील व गावातील २ नागरिक गंभीर आहे.