अहेरी:- आगामी काळात गणपती, शारदा, दुर्गोत्सव व अन्य सण समारंभ उत्साहाने साजरे केले जाणार असून सर्वांनी एकोपा व जातीय सलोखा राखून उत्सव साजरा करावे असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केले.
ते सोमवार 26 आगष्ट रोजी येथील पोलीस स्टेशनच्या सभागृहात सर्वधर्म समभाव सदभावना बैठकीत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अमोल मुक्कावार, ज्येष्ठ नागरिक हनीफ भाई, आलापल्लीचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावठे, अतुल तराळे, पोलीस उपनिरीक्षिक करिष्मा मोरे, जावेद अली आदी मान्यवर होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे म्हणाले की, गणपती, शारदा,नवरात्री दुर्गोत्सव , दसरा, दिवाळी, धम्म चक्र प्रवर्तन दिन, रमजान ईद तसेच अन्य धर्मियांचे सनासुदीच्या वेळी व देवी देवतांच्या विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये याची सर्वांनी दक्षता व खबरदारी घेण्याचे आवाहन करून राष्ट्रीय गीत व काव्यपंक्तीतून सर्वधर्म समभावाचे विचार मांडून सर्वधर्म समभाव व एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले. पुढेच नव्हे तर गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना शासनाचे तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्र संचालन सुरेंद्र अलोणे यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरिक्षिका करिष्मा मोरे यांनी केले. यावेळी गणपती, शारदा, दुर्गा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.