वर्धा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेश कक्षाचे वतीने जिल्हयातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व कालावधी, परीक्षा दरम्यान कालवधीत, परीक्षेनंतरचा कालावधी व परीक्षेच्या निकालानंतरच्या कालावधीत दुरध्वनीवरुन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी केले आहे.
सदर मार्गदर्शन व समुपदेशनाचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत एन.एम. घटवाई हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय वडनेरच्या राजेश सातपुते यांच्या 9325590686, मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूरच्या शरद वांढरे 9423420135, इंदिरा गांधी हायस्कुल, सालई(कला) ता. सेलू विठ्ठल पाटील 9823438205,अंजिठा विद्यालय सिंदी (मेघे) निळकंठ गुल्हाने 9850353447, आर.के. कनिष्ठ विद्यालय पुलगाव डॉ. रत्ना चौधरी 9096193665, यशवंत हायस्कर सेलू पुरुषोत्तम शेकार यांच्या 9766917338 या मोबाईल क्रमांकावर मानसिक समस्येचे निराकरण, परिक्षेची भिती, चिंता, तणाव कमी करण्यासाठी व अभ्यास कसा करावा. तसेच करीअर संधी बाबत मोफत मार्गदर्शन मिळणार आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी कळविले आहे.