• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

नवाब मलिकांचा राजीनामा घ्या – अन्यथा तीव्र आंदोलन

चंद्रपूर भाजपाचा इशारा : राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन

Ashish Ghume by Ashish Ghume
February 24, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
नवाब मलिकांचा राजीनामा घ्या – अन्यथा तीव्र आंदोलन
Spread the Information

 चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लागत आहे.बुधवारी असाच एक आरोप अल्पसंख्यांक मंत्री  नवाब मलिक यांच्यावर इ.डि ने चौकशीअंती लावून मलिक यांना अटक केली आहे.तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवून सरकार पाठराखण करीत आहे.याचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे गुरुवार 24 फेब्रुवारीला जटपूरा गेट चंद्रपूर येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले.सरकारने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल.असा इशारा चंद्रपूर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  डॉ मंगेश गुलवाडे यांनी दिला आहे.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ,जेष्ठ नेते प्रमोद कडू,तुषार  सोम, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश  धारणे,जिप अध्यक्ष संध्या गुरनुले,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी,माजी आ.सुदर्शन निमकर,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,मंडळ प्रमुख रवी लोणकर,विठ्ठलराव डुकरे,सचिन कोतपल्लीवार,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,संजय गजपुरे,नामदेव डाहूले,हनुमान काकडे,डॉ रामकुमार आकापेल्लीवार,अलका आत्राम,डॉ दीपक भट्टाचार्य,विजय वानखेडे,सुनील उरकुडे,अविनाश पाल,आशिष देवतळे,सुनील उरकुडे,हनुमान काकडे,अल्का आत्राम,अविनाश पाल,प्रभा गुडधे,रेणू घोडेस्वार,मंजुश्री कसंगोट्टूवार,प्रज्ञा बोरगमवार,माया मांदाळे,भारती दुधानी,पूनम गरडवा,सोपान वायकर,रवी आसवांनी,महेंद्र मंडलेचा,अरुण रहांगडाले,लीलावतीरविदास,माया उईके,गनेश रासपायले,राजू घरोटे,शीतल आत्राम,पुष्पा उराडे,राजेश थुल,मोहम्मद जीलानी,दिवाकर पुद्दटवार,गणेश,रामगुंडेवार,सतीश तायडे,संजय पटले,मोनिषा महातव,चंदन पाल,आकाश ठुसे,रामणारायन रविदास,आनंदराव मांदाळे,रुद्रनारायण तिवारी,लक्ष्मण कोडापे,राहुल पाल,प्रवीण उरकुडे,वैभव पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती.

डॉ गुलवाडे म्हणाले,ना.नवाब मलिक वरील आरोप गंभीर आहेत.इडिला एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले.9 ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे.मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली.ज्यांची मालकी आहे त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही.जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा बयाण दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? असा प्रश्न डॉ गुलवाडे यांनी आंदोलनात बोलतांना उपस्थित केला.

जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील 55 लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले.

कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे.देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?याचे उत्तर ना मलिक यांनी दिले पाहिजे.असेही डॉ गुलवाडे म्हणाले.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे.देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये.माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस यांनी जितके पुरावे होते, ते सर्व संबंधित यंत्रणांना दिले होते.तरीही मंत्र्यांचा राजीनामा ठाकरे सरकार घेणार नसेल, तर राजकारणाचा स्तर खालावेल.देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात व  पूर्ण सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही,म्हणून ना.नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊन छत्रपतींच्या महाराष्ट्रात लोकशाही नांदते,हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे.अशी मागणी त्यांनी केली.यावेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

Tags: bjp maharashtradevendra fadanvisdevrao bhongalenawab maliksudhir mungantiwar
Previous Post

गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

Next Post

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेणार !

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेणार !

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1