वरोरा ( गणेश उराडे) :– तालुक्यातील पाचगाव (ठा.) येथे 12 ऑगस्टच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास एक भयंकर घटना घडली. शेंडे कुटुंबातील दोन शेतकरी भावंडांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत एक बैल जागेवरच मृत्युमुखी पडला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
आग लागल्याचे प्रथम जनार्दन सिताराम शेंडे यांच्या गोठ्यात दिसून आले. शेकोटीमुळे लागलेली ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच शेजारील वासुदेव सिताराम शेंडे यांच्या गोठ्यालाही आगीने वेढले. गोठ्यातील चार बैलांपैकी एक बैल जागेवरच मृत्यूमुखी पडला, तर एक गंभीर जखमी झाला. उर्वरित दोन बैलांनी कसाबसा जीव वाचवला.
या आगीत शेंडे कुटुंबाचे शेतीसाठी उपयुक्त अवजारे, जनावरांचे संपूर्ण वैरण आणि इतर सामग्री जळून खाक झाली. जनार्दन शेंडे यांचे सुमारे 1 लाख 50 हजार रुपये आणि वासुदेव शेंडे यांचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रात्री 3 ते साडेतीनच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते किशोर मधुकर डुकरे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तहसीलदार योगेश कौटकर आणि अग्निशमन दल यांना संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होत.
शंकर बबन केदार यांचाही गोठा या आगीत सामावला. त्यांच्याही गोठ्यातील जनावरांचे वैरण, शेतीसाठी आवश्यक अवजारे, रासायनिक खत, आणि लाकडी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे पाचगावातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सतत चालू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि आता या आगीमुळे त्यांची शेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना आता शेती कशी करावी, हा प्रश्न भेडसावतो आहे.
प्रशासनाची कार्यतत्परता
रात्री 3 ते साडेतीनच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते किशोर मधुकर डुकरे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तहसीलदार योगेश कौटकर आणि अग्निशमन दल यांना संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांचा पाठिंबा:
सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी सांगितले की, “मी या शेतकऱ्यांसोबत असून महसूल विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्यांच्या सोबत असणार आहे .”