भंडारा जिल्ह्यातील आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था: प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आरोग्यसेवांवर प्रश्नचिन्ह; अतकरींच्या घणाघाती टीकेने मांडली समस्या
भंडारा (हंसराज रामटेके ): भंडारा जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राच्या निकृष्ट स्थितीवरून मोठा वाद उभा राहिला आहे. या केंद्राचे बांधकाम नव्याने करण्यात आले असले तरी, अनेक समस्यांमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सिपेजचा प्रॉब्लेम आणि पडक्या टाईल्समुळे रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री परिणय फुके यांनी यापूर्वी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची सूचना दिली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या गंभीर समस्यांवर शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठेकेदारावर कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाची आणि फुके यांच्या भूमिकेची कडक शब्दात निंदा केली आहे. अतकरी म्हणाले, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. शासनाच्या एवढ्या मोठ्या खर्चावर दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांचे हितसंबंध जपले जात आहेत.
2014 साली जिल्हा परिषद सदस्य असताना या आरोग्य केंद्राच्या सुधारणा कामासाठी 5 कोटींची मंजुरी मिळाली होती. परंतु, कामाचे दर्जा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही परिस्थिती तीच आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये गंभीर समस्यांमुळे रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले आहे. आरोग्य सेविका सांगतात की, भीतीच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत, टाईल्स उघड्या स्थितीत आहेत, आणि पाणी गळतीचा प्रॉब्लेम गंभीर बनला आहे.
किरण अतकरी यांच्या या घणाघाती टीकेनंतर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून रुग्णांच्या सुरक्षेची हमी द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.