शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांचे नेतृत्व
चंद्रपूर (सुरज माडूरवार) पोंभूर्णा तालूक्यातील पंधरा गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना वीजबिल भरणा न केल्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंद आहे १५ गावांना होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले विविध आजारांचा नागरिक सामना करत आहे. अशास्थितीत वारंवार सूचना करूनही संबंधीत विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.अखेर पंधरा गावातील प्रमुख नागरिकांनी युवा नेता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना आपबिती सांगितली पंधरा गावातील नागरिकांना होणारा त्रास बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आंदोलन पुकारले आज दि.१ गुरूवारी पोंभूर्णा पंचायत समिती समोर “घागर फोड आंदोलन” चे आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनकडून दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला कार्यालयातच घागर फोडून पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी पाणी फेकून निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे,शहर प्रमुख गणेश वासलवार,वेळवा सरपंच जितेंद्र मानकर,घनोटी सरपंच पवन गेडाम, आष्टा सरपंच किरण डाखरे, थेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे,रवींद्र ठेंगणे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार, महेश श्रीगिरीवार,बालाजी मेश्राम, सुनीता वाकुडकर , सुरेखा कुडमेथे, मंगलदास लाकडे,गोकुळ तोडासे,किशोर वाकूडकर तसेच पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शिवसैनिक,महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, सदस्य व त्या समस्या ग्रस्त पंधरा गावातील नागरिकांची मोठ्या संखेनी उपस्थिती होती.
तुम्ही पिता आरोचे पाणी जनता पिणार गडूळ पाणी…?
हा कुठला न्याय असा प्रश्न जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला.पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा येथील 15 गावांची ग्रिड पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावे या साधारण व जन कल्याणच्या मागणीकरिता गटविकास अधिकारी यांच्या कडे समस्या सोडवण्यासाठी गेले असता जाब विचारले म्हणून सर्वसामान्य जनतेचे तोड बंद करण्याकरिता गटविकास अधिकारी यांच्या कडून आंदोलकांवर गुन्हे दाखल. करण्यात आले.यावरून बल्लारपूर विधानसभेत लोकशाही नाही तर हुकूमशही असल्याचे दिसून येत आहे…
- संदिप गिऱ्हे
शिवसेना जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चंद्रपूर
गट विकास अधिकारी बेल्लालवार यांच्यावर गढुळ पाणी फेकण्यात आल्याने बेल्लालवार यांनी संबंधितावर पोंभूर्णा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३२,२८९,१८९/२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर करीत आहेत