भद्रावती : तालुक्यातील पाटाळा येथे सेवा ग्रुप फाउंडेशनच्या शाखेचे उद्घाटन दि. 22 फेब्रुवारी ला गुरुदेव प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सेवा ग्रुप फाउंडेशन चे अध्यक्ष निखिल मांडवकर ,उपाध्यक्ष कृष्णा ढोके , सचिव वैभव ठाकरे व इतर सेवा ग्रुप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवा ग्रुप फाउंडेशन चे शाखाप्रमुख म्हणून अमोल मेश्राम, उपशाखाप्रमुख शुभम मिलमिल, शाखा सचिव गणेश आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली.