चिमूर प्रतिनिधी शेषराव राऊत
काल दिनांक दि. २७ जुलै ला सतत धार पाऊस पडत असतानाही चिमूर तालुक्यात झालेल्या नुसकानीची पाहणी करण्याकरता आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी चिमूर तालुक्यातील मासळ, करबडा, मदनापूर, विहिरगाव, नेरी, कटारा रिठ, खुटाळा, नवतळा, लोहारा, आंबोली व जामगाव को. येथे परिसरात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
चिमूर तालुक्यातील काही घरे, शेतातील पीक, रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत. याची पाहणी करण्यात आली. व
संबंधित बांधकाम विभागाला दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गांभीर्याने आणि तातडीने करण्याच्या सूचना तहसीलदार, कृषी अधिकारी यांना दिल्या आहे. राज्य सरकारकडून तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतीचा बहुतांश भाग पाण्याखाली गेलेला असून रोपे व पिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक भागातील शेतपिके खरडून गेली, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा यावेळी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी जाणून घेतल्या.
तसेच सततधार झालेल्या पावसामुळे व नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांची, शेतीची अवजारे, जनावरे, अन्य-धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झालेले असून, आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी पडझड झालेल्या घरांचे जलदगतीने पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई/आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
तालुक्यातील जामगाव को. परिसरात शेतीच्या मध्यभागातून गेलेला मोखाबर्डी सिंचन उपसा योजनेचा कालवा फुटल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कालव्यातून पावसाच्या पाण्याचा प्रवाह तीव्र गतीने सुरू असून जणू शेतामध्ये नदी-नाल्याचे स्वरूप आलेले आहे. आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी सदर कालव्याची पाहणी करून सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटलेल्या कालव्याची जलदगतीने दुरुस्ती करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहे.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सर्वोतोपरी मदत तथा योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, पाहणी दौरा आटोपल्यानंतर प्रशासकीय भवन तहसील कार्यालय चिमूर येथे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी/यंत्रणा, विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
हे हि बघा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या -आ. कीर्तिकुमार भांगडिया (youtube.com)