अहेरी:आलापल्ली ते सिरोंचा (३५३ सी) या राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असल्याने गेली अनेक दिवसांपासून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे वळण मार्ग वाहून गेल्याने हा रस्ता वाहतुकासाठी बंद झाला.नागरिकांची अडचण लक्षात घेता अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित कंत्राटदाराला बोलावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
आलापल्ली ते सिरोंचा पर्यंत तब्बल शंभर किलोमीटर चे काम व पुलाचे बांधकाम तीन कंत्राटदारांकडून केली जात आहे.रेपणपल्ली ते सिरोंचा पर्यंतचा पट्टा मागील एक ते दीड वर्षांपासून काम सुरू आहे.तर आलापल्ली ते गुड्डीगुडम आणि गुड्डीगुडम ते रेपणपल्ली पर्यंतचा काम नुकतेच पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आला आहे.केवळ राष्ट्याचेच काम नव्हेतर पुलाचे बांधकाम देखील सुरू असल्याने हे काम पावसाळ्यात पूर्ण होऊ शकले नाही.पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने तात्पुरत्या स्वरूपात वळण मार्ग बनवला आहे.मात्र,वळण मार्ग मजबूत नसल्याने पहिल्याच पावसात त्याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आणि वाहन अडकत होते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तासनतास रहदारी ठप्प झाल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात होता.
सध्या तर मुसळधार पावसाने थैमानच घातला आहे. त्यामुळे नदी-नाल्यावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात सदर नाल्याला देखील पूर आल्याने वाहत्या पाण्यात वळण मार्ग वाहून गेला.त्यामुळे नागरिकांना नुकतेच तीन दिवसांपूर्वी तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला. त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिककाऱ्यांना व कंत्राटदाराला पाचरण करून प्रत्यक्ष या नाल्यावरील बांधकामाची पाहणी केली. तसेच तात्काळ वळण मार्ग दुरुस्त आणि अरुंद करून दोन्ही बाजूला दोरखंड बांधण्याचे सक्त निर्देश दिले.लगेच कंत्राटदारांने मनुष्यबळ आणि मशनरी लावून वडण मार्ग सुरळीत केले. त्यामुळे सध्या तरी पुसुकपल्ली फाट्यावर नागरिकांची अडचण दूर झाली आहे.