चंद्रपूर : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्युज पेपर एडिटर्स ऑफ पुणे या राष्ट्रीय संघटनेची बैठक कोल्हापूर येथे २३ फेब्रुवारीला संपन्न झाली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या आदेशाने आशिष मारोती घुमे यांची नागपुर विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कोल्हापूर येथील विश्वजननी यात्री निवास येथे संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत संघटन राज्य भर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्या साठी महसुली नऊ विभागामध्ये नियुक्ती करण्याचे ठरले . आशिष घुमे यांचा संघटनात्मक अनुभव व दांडगा जनसंपर्क बघता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या आदेशाने तसेच संघटनेचे सहसचिव तथा सल्लागार योगेश तुरेराव सोलापूर , राज्यकार्यकारणी सदस्य अजित पाटील रायगड यांच्या प्रमूख उपस्थीत आशिष घुमे यांची नागपुर विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य तथा वर्धा येथिल डॉ. कपिल मुन , राहुल मुन उपस्थीत होते . या नियुक्ती बद्दल संघटनेचे संस्थापक सचिव ईश्वरसिंग शेंगर यांनी अभिनंदन केले.