वरोरा :- शहरालगत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकार्जुना येथे २३ जुलै रोज मंगळवारला फॉउंडेशन ग्रुप वरोरा तर्फे वृक्षारोपण तथा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले . यावेळी मार्गदर्शन करतांना संस्थेचे सचिव प्रकाश खरवडे हे बोलत होते.
यावेळी एकार्जुना ग्रामपंचायत सरपंच उज्वला थेरे,संस्थेचे अध्यक्ष सपन डे,सचिव प्रकाश खरवडे, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मांडवकर,एकार्जुना विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष देविदास ताजने, हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष किशोर उत्तरवार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप मुठ्ठलकर , राजेंद्र जुमनाके इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते .
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनीं आपले मनोगत व्यक्त केले .राजेंद्र जुमनाके यांनी संस्था स्थापनेचा उद्देश व आजपावेतो संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली . समविचारी मित्रांनी मिळून २००६ मध्ये सुरु केलेल्या या संस्थे मार्फत आज पावेतो विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून .पुढेही सामाजिक क्षेत्रात काम करण्यास पुण्याईचा प्रत्येक सदस्य अग्रेसर राहील अशी ग्वाही संस्थचे सचिव प्रकाश खरवडे यांनी दिली.सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मांडवकर यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली . मान्यवरांच्या भाषणानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक संबाजी पारोधे , तर आभार सहायक शिक्षक विजय रोडे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षिका विद्या मोरे उपस्थित होत्या .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख दिपक मत्ते, निलेश आंबुलकर, सुमित वनकर , सचिन चिंचोलकर , अतुल वनकर , गणपत किन्नाके , किशोर विधाते , मुरलीधर डाखरे, दद्दू खंगार , सतीश थेरे , गणेश कसारे, दिलीप वऱ्हाडे , नीरज सायंकार यांनी अथक परिश्रम घेतले .