• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

पूरबाधित गावातील नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडवा

जिल्हाधिका-यांचे शासकीय यंत्रणेला निर्देश

Ashish Ghume by Ashish Ghume
July 22, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पूरबाधित गावातील नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडवा
Spread the Information

जिल्ह्यात 778 गावे बाधित; 11229 हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

चंद्रपूर : गत दोन दिवसात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. प्रादेशिक हवामान खात्याने अजूनही जिल्ह्याला अतिवृष्टी व सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन पूर पीडितांच्या मदतीसाठी तत्पर असून तालुका व गावस्तरावरील शासकीय यंत्रणेने पूरबाधित गावांना भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

जिल्ह्यातील पूरपरिस्थतीचा आढावा घेण्यासाठी वीस कलमी सभागृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अजूनही काही रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अशा रस्त्यावर वाहनांना तसेच नागरिकांना वाहतुकीस प्रतिबंध करावा. त्यासाठी आवश्यक बॅरेकेटींग करावी. पुराच्या पाण्यामुळे कोणतीही जिवीतहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील खालच्या यंत्रणेला निर्देश द्यावे. तसेच क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा जि.प.बांधकाम विभागाने डागडुजी करावी.

कृषी विभाग :

प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे जिल्ह्यातील 778 गावे बाधित तर 11229 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतमालाचे युध्दपातळीवर पंचनामे करा. कृषी सहायक, ग्रामसेवक, तसेच गावस्तरावरील सर्व यंत्रणांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे. तसेच जिओटॅगिंचे फोटो काढावेत.

पाणी पुरवठा विभाग :

पूरबाधित गावांमध्ये पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंत्यांनी भेट देऊन पाणी टाकी दुरुस्ती, बोअरवेल दुरुस्ती करून घ्यावी. तसेच नागरिकांना दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचे क्लोरीनेशन करावे.

आरोग्य विभाग :

पूरबाधित गावांमध्ये साथरोग पसरणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने विशेष काळजी घ्यावी. तालुका आरोग्य अधिका-यांनी पूरबाधित गावांना भेटी देऊन विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करून घ्यावी.

अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे :

स्थानिक परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी राहावे. याबाबतच्या सुचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विभागांना तातडीने द्या. तसेच ज्या गांवाना पुराचा तडाखा बसला आहे, तेथे तालुकास्तरीय सर्व विभागाच्या शासकीय यंत्रणेने पोहचून पूरपिडीतांच्या समस्या सोडवाव्यात.

०००००००

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट

Next Post

अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्य.

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्य.

अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1