मुल प्रतिनिधी
विदर्भात पावसाने थैमान घातले असून मुल शहरात 237 मिमी इतका पाऊस झाला, प्रशासनाच्या आकडेवारी नुसार मागील 8 वर्षात 12 तासात पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आहे, नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सकाळी मूलच्या तहसीलदार मोरे व नप मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलत शहरातील परिस्थिती जाणून घेतली, सोबतच पडझड, नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा त्वरित पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या,नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार नप मुख्याधिकारी यशवंत पवार तसेच संबंधित सर्व कर्मचारी व अधिकारी स्वतः शहरात फिरून परिस्थिती चा आढावा घेताना दिसले.सोबतच शहरातील भाजप कार्यकर्ते सुद्धा मुल शहरात प्रभावशाली भागात फिरून मदत करताना दिसले.
शहरात अनेक ठिकाणी स्वतः जेसिबी लावून भरलेले पाणी मोकळे करणे , टिल्लू पंप लावून घरात शीरलेले पाणी बाहेर काढणे, पडझड झालेल्या घरातील लोकांना प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या जागी पोहचवणे, घरात पाणी साचलेल्या लोकांसाठी जेवणाची सोय असलेल्या ठिकाणाची सूचना देताना भाजप कार्यकर्ते दिसत होते ,भारतीय जनता पक्षाकडून प्रमुख कार्यकर्त्यांची भ्रमणध्वनी क्रमांकासहित यादी सोशल मीडिया वर प्रकाशित करण्यात आली असून कोणत्याही प्रकारची अडचण जनतेला असल्यास सदर क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्रवीण मोहूरले, प्रशांत समर्थ, महेंद्र करकाड़े, राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, मिलिंद खोब्रागडे, अनिल साखरकर, संजय मारकवार, रिंकू मानदाडे, प्रशांत बोबाटे,सुखदेव चौथाले, युवराज चावरे , प्रज्योत रामटेके,सुनील कुकुडकर ,प्रमोद कोकुलवार, प्रशांत सीडाम व अनेक भाजप कार्यकर्ते व अनेक भाजपच्या महिला कार्यकर्त्या जनतेच्या मदतीला आहेत.