मूल प्रतिनिधी रोहित कामडे : गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे मुल शहरात जिकडेतिकडे पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टी मुळे मुल शहरातील वार्ड नंबर 14 येथील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले होते .घरातील अनेक वस्तूंची नुकसान झाली. खाद्यपदार्थ, अन्नधान्य खराब झाले .अशा परिस्थितीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून , गरजूंना छोटीशी मदत म्हणून डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात भूमिपुत्र ब्रिगेड, मूल यांच्या द्वारे धान्य किटचे वाटप करण्यात आले .त्याप्रसंगी भूमिपुत्र भूमिपुत्र ब्रिगेड शहराध्यक्ष नितेश मॅकलवार आणि पदाधिकारी राकेश मोहुर्ले,सुनील भाऊ कुकुळकार, संतोष चितादे,कपिल गुरनुले आणि कार्यकर्ते या कठीण प्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रशासानाने जनतेची सर्वतोपरी मदत करावी आणि अशा वेळेस भूमिपुत्र ब्रिगेड प्रशासनाच्या सोबत आहे असे सांगितले गेले.