चंद्रपुर- (सुरज माडूरवार)
गुरुवारी रात्री गोंडपिपरी तालुक्यात मुसळधार पाऊस आला या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.मात्र अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे.तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आरोग्य विभाग घेत असते.कुठलाही आजार झाला तर डॉक्टर निदान करत असतात.पाणी साचल्याने अनेक आजाराला आपण आमंत्रण देत असतो डेंग्यू सारखे आजार निर्माण होतात.अशावेळी मात्र नागरिकांची आरोग्याची काळजी घेणारे अधिकारीच आज संकटात सापडलेले आहे आजाराला आमंत्रण देत आहे .
गोंडपिंपरी तालुका आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व नेहमीच असते त्यामुळे कार्यालयात पायदळ जाताना देखील चिखलातून अनेक कर्मचारी त्या ठिकाणी पाय घसरून पडत आहे.सर्वसामान्य नागरिकांना देखील त्या ठिकाणी जायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पाणी साचल्याने डेंग्यू सारख्या आजाराचे बळी आरोग्य विभागाचेच अधिकारी ठरू शकतात.अशावेळी नगरपंचायतने लक्ष देऊन त्या ठिकाणी मुरूम काम करावे अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.