वरोरा:- विदर्भातील भोई समाजाचे नेते ॲड. अमोल बावणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र यांची महाराष्ट्र मत्स उद्योग विकास धोरण समिती च्या सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.
अमोल बावणे हे भोई समाजाचे नेते असून त्यांनी मागील १० वर्षा पासून सतत मच्छिमार समाजाच्या हितासाठी अनेक उपोषणे आंदोलने करून मच्छिमार समाजाला न्याय मिळून देण्याकरिता प्रयत्न केले त्यांनी विदर्भातील मच्छिमार समाजाचे संघटन वाढण्याकरिता तसेच समाजाला राजकीय प्रवाहात आणून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांनी मच्छिमार समाजाचे राजकीय ने्तृत्व निर्माण करण्याकरिता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली त्यांना चांगले यश मिळाले. मच्छिमार समाजाला चे प्रश्न त्यांच्या विकासाचे ध्येय धोरण ते आता निवड मत्स विभागाला देऊन मच्छिमार यांच्या विकासासाठी ते प्रश्न मांडतील, ॲड.अमोल बावणे हे या माध्यमातून ते समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.
ॲड .अमोल बावणे यांच्या नियुक्ती मुळे चंद्रपूर जिल्हावं विदर्भातील मच्छिमार समाज व इतरांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.