चिमूर प्रतिनिधी
अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला, वरोराच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने वीस वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. सचिन पांडुरंग मेहरकुरे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर घटना २५ एप्रिल २०१७ रोजी चिमूर तालुक्यातील एका गावात घडली होती.आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक २६ एप्रिल २०१७ रोजी अप क्रं.214/2017 कलम 377,504,506 सहकलम 6,8,10 पोस्को अधिनियमा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता . गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व पो. उपनिरीक्षक मनोज नाले यांनी आरोपी विरुध्द पुरावे गोळा करून सदर गुन्हयाची कागदपत्रे न्यायदानासाठी अतिरीक्त सत्र न्यायालय वरोरा येथे दाखल केले होते.
१८ जुलै २०2४ रोज गुरुवारला अतिरीक्त सत्र न्यायालय वरोरा यांनी केसचा निकाल देताना आरोपी विरूध्द सबळ पुरावे पाहुन आरोपी सचिन पांडुरंग मेहरकुरे यास कलम 235 (2) सीआरपीसी प्रमाणे 20 वर्षे कारावासाची शिक्षा तसेच ५ हजार रूपये दंडाची शिक्षा दिलेली आहे. तरी यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो. उपनिरीक्षक मनोज नाले यांनी तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी म्हणुन पोलीस अंमलदार अवधुत खोब्रागडे तसेच सरकारी अभियोक्ता गोविंदा उराडे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडुन सदर गुन्हयामध्ये पिडीत अल्पवयीन बालकास न्याय मिळुन देणे करीता महत्वाची भुमिका बजावली आहे.