गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
गोंडपिपरी येथील कन्यका माता मंदिर सभागृहात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होत असते.शहरातील प्रसिध्द असलेल्या या सभागृहात अनेक कार्यक्रम पार पडतात.मात्र हे कार्यक्रम संपन्न झाल्यावर जेवणावडीनंतर शिल्लक अन्नाची विल्हेवाट योंग्य पध्दतीने लावन्याच्या दृष्टीने मंदिर परिसरात बायोगॅस ची निर्मिती गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आली आहे.सभागृह परिसरात मोकाट परिसर असल्यामुळे जनावरांचा वावर दिसून येत असतो.दरम्यान कार्यक्रमातील अनावश्यक आणि नाशवंत अन्न बाहेर फेकल्यांनतर मोकाट गुरांनी तो खाल्ला तर त्यांना विषबाधा होऊन जीव जाऊ शकतो गोमातेचे रक्षण व्हावे अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी कन्यका मंदिर सभागृहात शिळ्या अन्नापासून बायोगॅसची निर्मिती करून सभागृहाची देखभाल करणारा व्यती त्याच्यातून आर्थिक बचत साधत स्वयंपाक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना दिसत आहे.
शहरात अनेक सार्वजनिक सभागृह आहे त्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते.मात्र हे कार्यक्रम गुरांच्या जीवनाशी सद्या खेळू लागले आहेत.जनावरे ही शेतकऱ्यांची संपत्ती आहे.त्यांचा शेती पूरक व्यवसाय गुरांच्या भरोवश्यावर चालतो.मात्र सामान्य लोकांच्या मूलभूत प्रश्र्नाबद्दल धनदांडग्यांना काही घेणेदेणे नाही.दरम्यान कार्यक्रमानंतर साधारणतः तिथे जेवणाचा कार्यक्रम आटोपतोच. कार्यक्रम संपल्यानंतर पंगतीतील शिल्लक अन्न सभागृहाच्या मागील भागात टाकण्यात येतात किंव्हा उघड्यावरील सार्वजनिक ठिकाणी हे अन्न टाकतात.अनेकदा ते अन्न खाल्याने गाईला विषबाधा झाली असल्याचे जनावराचा दुर्दैवी मृत्यू होताना दिसते.हा खेदजनक प्रकार असून जेवनावडिनंतर शिल्लक राहिलेल्या अन्नाची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे दिवसागणिक जनावरे मृत्युमुखी पडू लागल्याच्या घटना परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.अशावेळी ही गंभीर परिस्थिती समोर येवून देखील गोंडपिपरी नगरपंचायत याकडे दुर्लक्षच करीत आली आहे.सोबतच कार्यक्रमाच्या आयोजकाकडून सुध्दा अनावश्यक अन्नाची विल्हेवाट लावली जात नाही.त्याचवेळी येथील कन्यका मंदिर सभागृहाच्या परीसरात अनेक वर्षापासून
शिळ्या अन्नापाचे योग्य विल्हेवाट लावून बायोगॅसची निर्मिती केली जाते.या उपक्रमाचे आदर्श घेऊन इतरही सभागृहातील शिळ्या अन्नाचे योग्य विल्हेवाट लावावी अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.