*शेतकऱ्यांच्या मदतीला धावुन आला शिवसेनेचा वाघ *
*मुल प्रतिनिधी*
तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारली आणी शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावे जसे फिस्कुटी विरई,चीचाळा,हळदी ताडाळा,दहेगाव,भेजगाव हे गावे सिंचनाच्या भरवष्यावर आपले पिक पिक जगवितात,आणि आपली उपजीविका भागवतात,परंतु सुरुवातीला पाऊस आला आणि मग अचानक मुल तालुक्यात पावसाने दडी मारली,शेतकरी हवालदिल झाला,त्यात शेतकऱ्याना आपल्या हक्काचा माणूस संदीप गीऱ्हे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांना भ्रमणध्वनी द्वारे फिस्कुटी येथील माजी सरपंच अनिल निकेसर यांनी संपर्क केला.शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांनी 13 जुलै रोजी थेट फिस्कूटी हा गाव गाठून तेथील शेतऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत सिंचन विभागाचे अधिकारी यांचे शी भ्रमणध्वनी द्वारे त्वरित संपर्क केला आणि त्यांना अल्टिमेट दिला की शेतकऱ्यांना गोसी खुर्द प्रकल्पाच पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईल नी आंदोलन करण्यात येईलआणि याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील अस ठणकावून सांगितले असता आज दिनांक 15 जुलै रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांनी आपला ताफा शेतकऱ्यांसोबत घेऊन सिंचाई विभाग सावली येथे घेऊन जात असताना सिंचाई विभाग कार्यालयातून संपर्क केला की आपली मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असून 18 जुलै ते 25 जुलै दरम्यान शेतकऱ्यानं सिंचनाची सुविधा देण्यात येईल,प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती मिळाली असता.!
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांचे गावातील फिसकुटी,विरई,चिचाळा, तडाऴ,हळदी,गावातील जनतेनी मनापासून आभार मानले.
80 टक्के समाज कारण 20 टक्के राजकरण हेच शिवसेनेचे ध्येय धोरण या तत्वावर मि काम करत राहील असे प्रतिनिधिशी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यानी मत व्यक्त केले.