मुल (रोहित कामडे)
मुल तालुक्यात शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. शेतकरी व शेतमजूर याला शेतीत राबल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु मुल तालुक्यातील शेती जंगला लागत लागून असल्यामुळे शेतात काम करीत असतानाच वाघाने शेतकरी व शेतमजूर यांचेवर हल्ला करुन ठार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यामधे पडझरी ,कोसंबी, सुशी दाबगाव, केळझर, नलेश्वर, कांतापेठ, कवळपेठ,जानाला,
फूलझरी, डोनी, मुल,अंतरगाव पारडवाही,चीचाळा, करवन,काटवन,मारोडा,भादुर्णी, उसराला, मोरवाही, टेकाडी, इत्यादी गावातील मागील एका वर्षात १९ मानवावर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रानटी डुकराणे सुद्धा शेतकरी आणि शेतमजूर यांचेवर हल्ला करुन अनेक जणांना गंभीर जखमी केले आहे. एवढेच नव्हेतर रानटी डूकराच्या हैदोशाने शेतकऱ्यांच्या शेतातील धान,कापूस, तुरी, लाख, तीळ,या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे. तरीदेखील वन विभागाने वाघाचा,रानटी डुकराचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही, यात वनविभाग अपयशी ठरला आहे. वनातील वन्यप्राणी सुरक्षित आहेत,परंतु मानव अजूनही वन्यप्राण्यांपासून असुरक्षित नाही. याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे.
मुल तालुक्यातील शेकडो शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह,मुलांचे शिक्षण, मुलींचा विवाह करीत असतात,परंतु यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच वनविभागाने आपल्या वनाला तारेचे कुंपण केले नाही. जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करण्यासाठी शासनाने अनुदानही दिले नाही. असे असताना जंगलातील वाघ,बिबट,अस्वल,रान डुक्कर हे शेताकडे यायला लागले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात जाऊन शेती करणे कठीण झाले आहे. कसे तरी धान पेरणी केली,कोणी आवत्या तर कोणी पऱ्हे टाकले आहेत. परंतु आता रोवणी,खत,औषधी फवारणी करायला गेले असता शेतातच आणि शेताजवळ वाघाचे दर्शन झाले.त्यामुळे अनेक शेतकरी वाघाच्या भीतीमुळे शेताकडे जाणेच बंद केले आहे. जर शेतकरी शेतातच गेला नाही,तर शेतीचे उत्पन्न कसे घेणार आणि उत्पन्न घेतले नाही तर कुटुंबीयांचे पालन पोषण,शिक्षण कसे करणार या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. असे असताना परत शेतकऱ्यांवर पाऊसाचे नैसर्गिक हल्ले होतच असून नुकतेच शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासून सारखा पाऊस येत असल्याने तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ येण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. अशा प्रसंगी शासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.करीता शासनाने आपल्या वाघाचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा,जेणे करुन शेतकऱ्याला शेती करता येईल, अन्यथा अशा शेतकऱ्यांना शेतीत होणाऱ्या उत्पन्न एवढी नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्याला द्यावी,अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.