गोंडपिपरी :- राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त, आतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कुद्री गावातील सुप्रिया शंभरकर तर पेठा गावचा अजित कोरामी आणि अन्य चार असे एकूण सहा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी लॉयड मेटल्सच्या पुढाकारातून उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया गाठले आहेत. होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हवाई सफारीचे तिकीट देण्यात आले.
लॉयड मेटल्स कंपनी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोह उत्खनन करीत असून या कंपनीचा चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे स्टिल निर्मिती प्रकल्पही आकाराला येत आहे. सुमारे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे व्यवस्थाकीय संचलक गी. प्रभाकरण यांनी लॉयड इन्फिनिट फाऊंडेशनच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील होतकरून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 38 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातून बुद्धिमत्ता, शैक्षणिक कामगिरी, इंग्रजी ज्ञान, शिकण्याची उत्सुकता आणि परदेशी वातावरणाशी जूळवून घेण्याची क्षमतेचे काटेकारपणे मूल्यांकन करण्यात आले. यात पात्र ठरेलेल्या सहा विद्यार्थ्यांची परदेश शिक्षणासाठी निवड करण्यात आली. त्यांना इंग्रजी विषयाचे विशेष प्रशिक्षण दिले. शिक्षणासाठी सुमारे एक कोटी 51 लाख 5 हजार 492 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली. ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ या नामाकिंत संस्थेत हे सर्वजण उच्चशिक्षण घेणार आहेत.
या विद्यार्थ्यांचा समावेश
सुप्रिया शंभरकर ही बॅचलर ऑफ मायनिंग इंजिनिअरिंगच्या चार ते पाच वर्षाच्या पदवीच शिक्षण घेणार आहे. तर शिल्प महा रा. मंगनेर ही बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी घेणार आहे. पेठा गावचा अजित कोरामी व शुभम गोटा हे दोघे बॅचलर ऑफ सायन्स (हेल्थ सायन्स) ही पदवी संपादन करणार आहेत. झारेवाडाचा राहूल नरोटी हा बॅचलर ऑफ कॉमर्सचे शिक्षण घेईल तर इग्नासिय बडा रा. बंडे हा मास्टर ऑफ इनोव्हेंशन अँड एंअ्रेप्टरशिपच्या पदवीच शिक्षण घेणार आहे.