गोंडपिपरी -(सूरज माडूरवार)
चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा गोंडपिपरी तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात या मार्गावरून अवैध दारू,चोरबिटी,सुगंधित तंबाखू तस्करी होत असते.अशातच दि.(९) मंगळवारी गोंडपिपरी पोलिसांच्या तत्परतेने गांजा तस्करीचा भांडाफोड करण्यात आला.
अधून मधून पोलीस विभाग अवैध धंद्या विरोधात नाकाबंदी राबवत असतात.अशातच मंगळवारी ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे नाकाबंदी गस्तीवर असताना रात्री ३ वाजता बोलेरो गाडी क्रमांक MH 34 BG 4669 ही भरधाव वेगाने आष्टी वरून बल्लारपूर मार्गे जात असताना दिसली .संशय आल्याने छत्रपती शिवाजी चौकात सदर गाडीला थांबवुन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 9 किलो 770 ग्रॅम गांजा सापडला.या गांजा तस्करी प्रकरणी चालक आरोपी शेरखान आजमखान पठाण रा. बल्लारपूर याला अटक करुन सात लाख रूपये किमतीची बोलेरो गाडी व एक लाख रुपये किमतीचा गांजा असा एकुण आठ लाख रूपये किमतीचा मुद्देमल जप्त करण्यात आला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे,पो .हवा मनोहर मते, नंदकिशोर माहुरकर,विलास कोवे,पोलीस अमलदार तिरुपती गोंडसेलवार,संजय कोंडेकर, नासिर सय्यद,प्रशांत नैताम यांनी केली आहे.कारवाई दरम्यान तहसीलदार शुभम बहाकर यांना बोलावून त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.पुढील तपास सुरू आहे.