गडचिरोलीः अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेली लोकं केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे. कधी चारचाकी वाहनात चक्क बियरचे पेट्या टाकून टाकून, तर कधी पार्सल सामनातून दारूची तस्करी केली जात आहे. मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी कारवाईचा धडका आणि गुन्हेगारांना खाकीचे धडकी देत अहेरी पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत.
नुकतेच ,६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी पोलिसांनी अहेरी येथील पेट्रोल पंप येथून एक किमी अंतरावर दक्षिण भाग येथे अवैध दारू तस्करीवर कारवाई केली.
त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध दारू आढळून आली.
यात एम एच ३३ ए ३०८५ टाटा इंडिका कंपनीच्या कार मध्ये
पोलिसांनी अवैध दारूसह तब्बल ३ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ६:४० वाजता सायंकाळी म्हणजे ६ जुलै रोजी अहेरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एम एच ३३ ए ३०८५ क्रमांकाचा संशयित टाटा इंडिका चार चाकी वाहनाची अहेरी पोलिसांनी अहेरी पेट्रोल पंप जवळ दोन पंचांसमक्ष प्रोवि रेड बाबत पाहणी केली असता गाडी मध्ये पांढऱ्या रंगाच्या खर्ड्याच्या खोक्यात ५०० एम एल मापाचे बियरचे १४४ टिन बॉटल ४३,२०० रू.किमतीचा मुद्देमाल जप्त केला चालक नाव.गट्टू चंद्रया गड्रागोटावार 31 वर्ष. धंदा- मजुरी रा-पंदेवाई तालुका- एटापल्ली यास ताब्यात घेतले आहे.अवैधरित्या विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारू तस्करास पकडण्यात यश आले.
अहेरी पोलिसांनी कारवाई करत आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे. पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे, पोलीस अंमलदार मनोज शेंडे,तपासी पोलीस अंमलदार स फौ राऊत,पोलीस अंमलदार दहिफळे, पोलीस अंमलदार भरतसागर यांनी केली.