वरोरा :- शहरामध्ये डेंग्यू आजाराने सध्या डोके वर काढले आहे. आत्तापर्यंत ७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, अनेक संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये ५ जुलै पर्यंत एकूण ७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. यातील ५ रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर २ रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या तापाची साथ सुरू असून डेंग्यू रुग्ण आढळल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून याची दखल घेवून उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे .
उपजिल्हा रुग्णालयाचे बैधकिय अधीक्षक डॉ. खुजे यांना विचारले असता त्यांनी ही माहिती आमच्या प्रतिनिधींना दिली .
शहरातील सर्व पॅथॉलॉजी लॅब चा संयुक्त ग्रुप तयार केला असून त्या माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी हा आकडा सांगितला आहे .