तळोधी (बा ):प्रतिनिधी.
नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील सोनाई प्राव्हेट लीमिटेड कंपनीकडून कंपनीच्या समोरील आवारात दि.१४ जुन रोजी फेकण्यात आलेले विषारी टाकाऊ खाद्यपदार्थ खाल्ल्याने तेथे चरत असलेल्या हरीचंद्र जिगरवार यांच्या ८ शेळ्यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान मोबदला देण्याचे कंपनीने कबूल केले होते.मात्र जवळपास १महिना लोटूनही मोबदला मिळाला नसल्याने गुरुवार दि.4 जुलै रोजी सदर कंपनी समोरच वाढोणा येथील धनगर (कुरमार) समाज गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे.
तालुक्यातील वाढोणा परिसरात कामे सूरू असल्याने वाढोणा येथे सोनाई प्रा.ली.कंपनी उभारण्यात आली आहे.या कंपनी समोर भरपुर खुला आवार आहे. कंपनीच्या आवारा बाहेरील बाजूत कंपनीच्या लोकांनी जीवितहानी घडवणारे टाकाऊ तर काही विषारी पदार्थ टाकले. त्या ठिकाणी धनगर समाजाच्या शेळ्या- मेंढ्या चरत असताना तेथील पदार्थ खाल्ल्याने हरीचंद्र जिगरवार यांच्या ८ शेळ्या मृत पावल्या.आणि काही शेळ्या बिमार पडल्या मात्र वेळीच उपचार झाल्याने त्या बचावल्या.दरम्यान कंपनीने मृत शेळी मालक हरीचंद्र जिगरवार यांना मोबदला देण्याचे कबूल केले.परंतु पाऊण महिना लोटूनही आतापर्यंत कुठलीच नुकसान भरपाई दिली नाही.म्हणून धनगर समाज व गावकऱ्यांनी सोनाई कंपनी समोरच गुरुवारी ठिय्या आंदोलन सूरू केले आहे. दरम्यान या आंदोलनामध्ये नागभीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष कृष्णा गंजेवार यांच्या नेतृत्वात नागोजी चौडेवार, धनगर समाज प्रमुख युवराज डेकरवार,हरिचंद्र जिगरवार,रवींद्र येगेवार,बाबुराव ओगुवार,रमेश कोमावार,विनायक बुडमेवार, बाबुराव नसकुलवार,लक्ष्मण ओगुवार,गणेश उईनवार, आनंदराव नस्कुलवार,चक्रधर झोडे,लीलाधर सोनवाणे,स्वप्निल आंबोरकर,एकनाथ जिगरवार, दौलत पोतरजवार,पुरुषोत्तम बुडमेवार,मयूर परसवार,मनोज कंकलवार,बंडू उईनवार,मंगेश अन्नावार,युवराज उईनवार, भास्कर देवेवार आदिंचा समावेश आहे.