सेलू (वर्धा):- सहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या घोराड ग्राम पंचायत वर दिनांक ४जुलै पासून प्रशासक राज येणार आहे.
१५ सदस्य संख्या असलेल्या घोराड ग्राम पंचायत मध्ये सलग १० वर्ष महिला सरपंच आहे ज्योती घंगारे ह्या सलग दोन वेळा सरपंच म्हणून निवडून आल्या त्यांच्या दहा वर्षाच्या काळात जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे यांच्या माध्यमातून व आमदार पंकज भोयर यांच्या निधीतून अनेक विकास कामे या गावात झाल्याने गावाचा विकास घडून आला. या ग्राम पंचायत सदस्याची पाच वर्ष दिनांक ३ जुलै ला पूर्ण होत आहे पण सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर गेल्याने दिनांक ४ जुलै पासून या गावाचा कार्यभार प्रशासक पाहणार असून महिला सरपंच असलेल्या या गावाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पाणबुडे हे महिला प्रशासकाची नियुक्ती करण्याची शक्यता असून सेलू पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी संगीता महाकाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .यांना असलेला प्रशासनिक अनुभव पाहता गावाचा सुरू असलेला विकास हा निरंतर राहण्याची शक्यता असून या गावाला प्रभारी ग्राम विकास अधिकारी म्हणून लक्ष्मण गुडवार आहे या गावाला प्रशासक येणार असले तरी प्रशासक यांनी मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे
या अगोदर सेलू तालुक्यात २८ ग्राम पंचायत वर १४ प्रशासकाची नियुक्ती पंचायत समितीने केली आहे सुरळीत कारभार सुरू असताना ग्राम विकास अधिकारी असलेली तालुक्यातील लोकसंख्येने मोठी असलेली घोराड ग्राम पंचायत आता प्रशासकाच्या ताब्यात राहणार आहे गावातील नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासकाला या गावाला ग्राम पंचायत मध्ये उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे हे विशेष.