• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 27, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
लंडन येथील जागतिक परिषदेत गडचिरोलीच्या गोंडी शाळेवर चर्चा:ॲड बोधी रामटेकेंचा सहभाग
Spread the Information

गडचिरोली:लंडन येथे नुकतीच जागतिक ‘मानववंशशास्त्र व शिक्षण‘ परिषद पार पडली. यात विविध विषयांवरील संशोधन सादर करण्यासाठी जगभरातील अभ्यासक उपस्थित होते. भारता सारख्या पूर्ववसाहती देशात अस्तित्वात असलेले आदिवासी निवासी शाळा आणि त्यात रुजत चाललेला वसाहती दृष्टीकोन म्हणजेच एकंदरीत आदिवासीकेंद्रीत नसलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे जगभरातील आदिवासी समाजाचे होणारे सामाजिक- सांस्कृतिक शोषण हा सुद्धा या परिषदेतील प्रमुख चर्चेचा विषय होता. यात ॲड बोधी रामटेके यांनी गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाने सुरु केलेल्या गोंडी माध्यम शाळेवर केलेले संशोधन मांडले.ॲड बोधी रामटेके हे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असून, सध्या युरोपियन सरकारच्या इरॅसमस मुंडूस शिषवृत्तीच्या माध्यमातून युरोप खंडात चार देशातील नामांकित विद्यापीठात कायद्याचे उच्च शिक्षण घेत आहेत.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

स्वतंत्र भारतातील शैक्षणिक धोरणे आदिवासी समाजाच्या गरजा लक्षात न घेता त्यांच्यावर सरसकट थोपवल्या आहेत, ज्यामुळे आदिवासी समाज त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरे पासून दूर केले जात आहे. भाषा, संस्कृती नष्ट होणे म्हणजे, त्या समाजाचे अस्तित्व धोक्यात येणे होय. ‘मागास, असंस्कृत किंवा जंगली’ असा आदिवासी समाजाला घेऊन असलेला दृष्टीकोन, अद्याप कायम आहे, असे मत त्या परिषदेत रामटेके यांनी मांडले. पुढे आदिवासी समाजाला पूरक नसलेल्या शैक्षणिक धोरणांना आव्हान देत, आदिवासी विकासासाठी एक आदर्श शैक्षणिक प्रणाली म्हणून गडचिरोलीच्या मोहगावातील गोंडी शाळा कश्याप्रकारे उभी राहिलेली आहे यावर भाष्य केले.

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे २०१९ साली ग्रामसभांनी एकत्रित येऊन ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध गोटून’ या शाळेची स्थापना केली. ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात गोंडी भाषेत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. संविधानातील अनुच्छेद ३५० (अ) अन्वये मातृभाषेत शिक्षण देण्याबाबतची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपावली आहे. या सोबतच ग्रामसभांना पेसा किंवा वनहक्क कायद्याअंतर्गत त्यांची संस्कृती, भाषा संवर्धन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. ज्याचा वापर करत ही शाळा अस्तिवात आली. अधीकारांच्या कक्षेत राहून सुरु असलेल्या शाळेला २०२२ साली शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ‘अवैध किंवा अनधिकृत‘ ठराविण्यात आले.

शाळेच्या स्थापनेपासून तर त्यांना अवैध ठरविल्या नंतर न्यायालयाच्या माध्यमातून सुरु असलेला लढ्याबाबतच्या एकूणच संघर्षाबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. पूढे रामटेके सांगतात की, कॅनडा व जगभरातील अभ्यासकांनी अनेक दाखले देत सिद्ध केले की, सांस्कृतिक वातावरणात, मातृ भाषेतून शिक्षण दिल्यास त्या समाजाचा एकंदरीतच विकास होतो. परंतु तसे न करता शाळेला अनधिकृत ठराविणे असंविधानिक असल्याचे मत रामटेके यांनी मांडले.

मोहगाव ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे, शिक्षक शेषराव गावडे व इतर सदस्य व शिक्षकांचा परिषदेत उल्लेख झाला. गोंड आदिवासी समाजाच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमाची जगभरातील अभ्यासाकांनी प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Previous Post

‘त्या’ मार्गावरुन अवजड वाहतूक सुरुच

Next Post

१६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
१६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

१६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1