पुलगाव-येथील जिजामाता कॉलनी रहिवासी तेजस्विनी प्रभाकर भोयर (वय वर्ष १९), मागील दीड वर्षापासून बोन मॅरो या दीर्घ आजाराने ग्रासले होते. आपल्या परिस्थितीनुसार तेजस्विनीवर उपचार सुरू होते. परंतु आजार शरीरात मोठ्या प्रमाणात पसरत असताना त्यावर उपचार करणे सुद्धा कठीण होते, अनेक छोट्या मोठ्या दवाखान्यात उपचार घेण्यात आले.त्या आजारावर मात मिळवण्याकरिता मुंबईतील मोठ्या इस्पितळात सुद्धा दाखल करण्यात आले. परंतु तेथील खर्चामुळे तिला उपचार दरम्यान माघार घ्यावी लागली.आजाराला फार मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असल्याने वेळेपर्यंत मोठ्या बहिणीने आपल्या परिस्थितीचा सामना करून तेजस्विनीला दवाखान्यातील उपचार सुरू ठेवले व अशातच समाजातील माणुसकी म्हणून अनेक लोकांनी तिला उपचाराकरिता आर्थिक सहकार्य ही केले.परंतु नागपूर येथील एम्स इस्पितळात १६ जून रोजी तिची प्रकृती जास्त प्रमाणात बिघडल्यामुळे दाखल करण्यात आले. तिला अनेक त्रास होत होते. व तिच्यावर उपचार सुरू असताना तेजस्विनी ची प्रकृती हळूहळू खालावल्या गेली. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच रक्ताच्या थारोळ्या तोंडावाटे होत्या.हळूहळू डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे रक्तात सुद्धा इन्फेक्शन झाल्याचे सांगण्यात येत होते. सोबतच शरीरातील तापमान ही जास्त प्रमाणात राहत असल्याने तिचे शरीर ही साथ देत नव्हते. अश्यातच उपचारदरम्यान २५ जून च्या पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.