गोंडपिपरी :- ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून येत्या रविवारी (दि. १६ जून) गोंडपिपरी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्कपणे करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
सदर शिबीर सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार असून याठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग आणि त्वचारोग यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांनी सेवा केंद्रात जाऊन तसेच नजिकच्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडे आपल्या नावाची नोंद करावी आणि शिबीरात येतांना आधारकार्ड व केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे. असेही आवाहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालयातकडून करण्यात येत आहे.