पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट जॉन हायस्कूलचे घवघवीत यश
पुलगाव :- महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व माध्यमिक विभागातून ( वर्ग 5) एकूण 9 विद्यार्थ्यांपैकी 3 विदयार्थी उत्तीर्ण झाले ह्यात अनन्या इमाने, सिद्धी पागोटे, कृपा देशपांडे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर माध्यमिक (वर्ग 8) गटातून 40 पैकी 17 विदयार्थी अनुक्रमे सिद्धांत फुसाटे, ताहूर कुरेशी ,लावण्या गाढवे , दिग्विजय इंगोले, नारायणी चचाणे , अवधी धवणे , श्रेयस पाटील, अमेय खोडे क्षितिजा ताकसांडे, रुहानी खोबे, पूर्वा डहाके , हिमांशू पनपालिया, मिताली वैद्य, माही ढोले,प्राची दंतेवार, शिवांगी कुरझडकर, आनंदी रामगावकर इत्यादी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष म्हणजे 2022-23 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व माध्यमिक गटातून(वर्ग 5) मधून अंशुमन गुल्हाने, सोहम टाके हे दोन विद्यार्थी तर वर्ग 8 (माध्यमिक गटातून)कृष्णप्रिया घोटेकर, श्रावणी बुल्ले, संस्कृती अवसरे, दिशा वर्मा, कार्तिक चव्हाण, पूर्वा गावंडे, मीत खुराना हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेत.
विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट यश ही खरोखरच शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे बाब आहे .त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा प्रीती बोरसे ,शाळेचे प्रबंध संचालक चंद्रशेखर इंगळे, प्राचार्य संतोष यादव, उपप्राचार्या आरती कुरझडकर ,उपप्राचार्य महेंद्र भोयर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे मनोबल वाढवून भविष्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.