नागरिकांसाठी गोंडपिपरी पोलिसांची सतर्कता
महत्वाच्या सूचना पाळण्यासाठी जनतेला आवाहन
लाऊड स्पीकरने जनजागृती
गोंडपिपरी – सूरज माडुरवार
सद्या सर्वत्र उन्हाळ्याच्या सुट्या असून नागरिक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी किंव्हा फिरण्यासाठी जातात तर काही मंडळी पाहुण्यांकडे जात असतात.हीच संधी साधत चोरट्यांनी अनेकदा संधी साधत डल्ला मारल्याच्या घटना घडत असतात.या घटना टाळण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी सतर्कता बाळगत नागरिकांना महत्वाच्या सूचना पाळण्यासाठी आव्हाहन केले.
मागील वर्षात गोंडपिपरी तालुक्यात चोरट्यांनी धुळगुस घातला होता.रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या ब्याटऱ्या,पाळीव जनावरे कोंबडे,बकरे,शेती उपयोगी वस्तू पिके कापूस,धान चोरीला गेल्याच्या घटना घडल्या.अशा घटना टाळण्यासाठी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी स्वकल्पनेतून एक पाऊल पुढे टाकत सतर्कता बाळगन्यासाठी नागरिकांना आव्हाहन दि.(५)रविवारी लाऊड स्पीकर द्वारे सूचना देत जनजागृती केली.
बाहेरगावी जाताना घराला मजबूत कुलूप लावावे,घरामध्ये मौल्यवान वस्तू, दागिने रोख रक्कम न ठेवता सुरक्षित रित्या बँकेत लोकर मध्ये ठेवावी,शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, रात्री झोपताना घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपू नये, बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन लक्ष ठेवण्यास सांगावे ,कोणी संशयित व्यक्ती किंवा टोळी दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी ,लग्न समारंभात जाताना विशेष काळजी घ्यावी दागिने, पैसे पर्स इत्यादीवर लक्ष ठेवावे .एसटी बस मध्ये चढताना उतरताना गर्दीचे ठिकाणी आपल्या पर्स दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी,पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेतच पोलिसांनी दिलेल्या सूचना पाळाव्या असे आव्हाहन ठाणेदार हत्तिगोटे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलिसांनी केले आहे .