मुल :-
लक्षात असू द्या, मतदार बंधू-भगिनींनो, मतदान करायचे आहे!
लोकसभा निवडणुकीनिमित्त काका, काकू, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आजोबा या नात्यांना मतांसाठी आता उजाळा मिळाला आहे. मतदार बंधू-भगिनींनो, काही चुकले असेल तर माफ करावे; परंतु यावेळी आपल्या राजकीय पक्षांनी दिलेली संधी पुन्हा येणे शक्य नाही. त्यामुळे थेट या नातेवाइकांसमोर मतांच्या जोगव्यासाठी विनवणी करणे, हात जोडणे उमेदवारांनी सुरू केले आहे. एरवी मावशी, आत्याकडे फारसा लक्ष न देणारा भाचासुद्धा आता लक्ष द्यायला सांगतो आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे.
13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर का होईना, जुन्या नात्यांना मतांमुळे चार्जिंग मिळू लागले आहे. कसभेची निवडणूक अतिशय रंगतदार; पण तेवढीच चुरशीची होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांनी मते मिळविण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबायला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघातील
नातेवाइकांच्या याद्या तयार केल्या आहेत. संबंधित नातेवाइकांचे मागील अनेक वर्षांचे असलेले संबंध, त्यावेळी त्यांच्या लग्नकार्यात आपण सहभागी झालो होतो, मुलाच्या वाढदिवसाला तर, वडिलांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला आलो होतो, अशा प्रकारच्या मागील जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेची माहिती मतदार नातेवाइकांना नाही; परंतु संबंधित उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते त्या आठवणीला उजाळा देत आहेत.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे.
प्रशासनही लागले कामाला 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता
लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. मतदान केंद्रे सज्ज होत असून, निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणे सध्या सुरु आहेत. पथके स्थापन करण्यात आली आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा माहौल तयार झाला आहे.