मुल (रोहित कामडे) : हातात खराटे,पावडे,घमेली घेत भल्या पहाटे एक अवलिया सोमनाथ,स्मशाभूमी,गावामध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो.ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांनाही अप्रुप वाटते.आपोआप लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात.काही तासात परिसरातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो.ही किमया करणारा अवलिया आहे गौरव गो शामकुळे.
मुल येथील रहिवासी असलेल्या गौरव गोपीचंद शामकुले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला आहे. त्यांनी आजपर्यंत दिवसाला दोन तास,सहा वर्ष ग्राम स्वच्छता केली आहे.सोशल मीडियाद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले व जनजागृती केली आहे.
गौरव शामकुळे यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांना नैतिक पाठबळ लाभले आहे.त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय असून आपल्या व्यवसायातही ते वेळ देत असतात.जनसामान्यांना मदत म्हणून घमेले,पावडे,झाडू,स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य मागून ग्रामस्वच्छेतेचे काम अविरतपणे करत आहेत. स्वच्छ्ता मित्रा या नावाने जिल्ह्यात ते परिचित झाले आहेत.‘ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र, आरोग्य आणि समृध्दी एकत्र’, ‘आपली स्वच्छता आपल्या हाती, मिळेल आजारातून मुक्ती’ अशा विविध प्रेरक घोषवाक्यांच्या जनजागृती करतात.गौरव शामकुले सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. राजकीय, सामाजिक,पर्यावरण, व्यवसायिक हे त्यांचे आवडीचे विषय याच्यात प्रामुख्याने ते सहभागी होऊन विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करीत असतात.मुल मधील स्मशाभूमीतील अस्वच्छता बघता स्मशानभूमीची स्वच्छता अभियान सुरू करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम युवकाने केलेल आहे.
काही दिवसातच स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी सायकल द्वारे मुल तालुक्यात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल स्वारी करून यात्रा करणार आहेत.
स्वच्छता मित्रा या टीम मध्ये पाच मित्रांनी दोन तास सहा वर्ष निस्वार्थ सेवा आजही देत आहे.सकाळचे दोन तास स्वच्छतेला देऊन बाकी आपला व्यवसाय नोकरी,स्वच्छता मित्रा टीम मधील युवा वर्ग करीत आहे.
हिवाळा,पावसाळा,उन्हाळा,न थकता निस्वार्थ स्वच्छतेचा मंत्र मनात घेऊन अविरत सेवा आजही चालू आहे,महात्मा गांधींनी दिलेला संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा आपला गाव, शहर,वार्ड,स्वच्छ राहण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करीत आहे.
आज गावा-गावात ३० ते ३५ वय वर्ष ओलांडलेले असंख्य तरूणांचे विवाह झालेले नाहीत.पूर्वीही गावांमध्ये उत्सव, सप्ताह,जत्रा गुण्यागोविंदाने, आनंदाने आयोजित केले जात होते. आज मात्र याला बीभत्स, धांगडधिंग्याचे स्वरूप आले आहे.उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चार ते पाच गोण्या भरतील एवढ्या दारूच्या बाटल्यांचा कचरा निघतो.आजच्या समाजाला संत व महापुरुषांच्या विचारांची शिकवण नव्यानं देण्याची गरज निर्माण झाली आहे.