वरोरा प्रतिनिधी
:- वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा (पारधी टोला) पिपरबोडी येथे अखेर ग्रामस्थांनी दारूबंदी चा एकमताने निर्णय घेतला आहे. चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी टोला पिपरबोडी हे लहानसे गाव आहे. जेमतेम गावची तिनसे लोकसंख्या , परंतु चार चार घरी दारु विक्री, यातच किशोर वयातील मुले दारूच्या आहारी गेले. गावातील महिला दारूड्या पतीच्या त्रासापायी कंटाळलेल्या होत्या.
श्री हनुमान मंदिर देवस्थान कमेटिच्या पदाधिकाऱ्यांनी दारु विक्रेत्यांना एका महिन्या अगोदर दारूबंदी बाबत सुचनाही दिल्या होत्या. अनेकदा आपआपसात भांडण तंटे व्हायचे पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी च्या चकरा व्हायच्या, दिनांक १६ फेब्रुवारी ला हनुमान देवस्थानचे पदाधिकारी, चिनोरा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गावातील चौकात सभा बोलावली.दारू विक्री या नंतर करू नये. केल्यास पोलीसांना तक्रार देण्यात येईल अशी दारूविक्रेत्यांना तंबी देण्यात आली.यानंतर गावात दारू आम्ही विकणार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सभेला आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे,चिनोरा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सुशिला तेलमोरे, सदस्य गजानन भोयर, ञिशुल निबुधे, श्री हनुमान मंदिर देवस्थान चे अध्यक्ष रवींद्र शेरकुरे, उपाध्यक्ष नेपाल शेरकुरे,वामण नन्नावरे,सदाशिव नन्नावरे, दिवाकर नन्नावरे, राजेश्वर नन्नावरे, प्रमोद घोसरे ,वामण नन्नावरे, प्रवीण नन्नावरे, अमोल घोसरे,व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.