गोंडपिपरी -(सूरज माडूरवार)
गोवंशीय जनावरांची पायदळ तस्करी करणाऱ्या आरोपींना गोंडपिपरी पोलिसांनी दि.(९) शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान ३२ जनावरांची सुटका केली तीन लाख वीस हजाराचा माल जप्त करत याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली .
तेलंगणा राज्याची सीमा गोडपिपरी तालुक्याला लागून असल्याने छुप्या मार्गाने वाहनात कोंबून तर कधी पायदळ जनावरांची नेहमीच कत्तलीसाठी तस्करी होत असते.अशातच नव्याने रुजू झालेले ठाणेदार हत्तीगोटे यांना तस्करीची माहिती मिळताच सहकारी मनोहर मत्ते,गणेश पोदाळी,विलास कोवे,संजय कोंडेकर,विजय पवार या पोलिसांसह वढोली गाठून आरोपींना ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.त्यानंतर १६ जनावरांना बोरगाव येथील कोंडवाड्यात तर उर्वरित १६ जनावरांना धाबा येथील कोंडवाड्यात पाठवण्यात आले.
मूल – वढोली विठ्ठलवाडा मार्गे गोवंशीय जनावरांची पायदळ वाहतूक करून आरोपी हे नंदवर्धन नदीघातातून जनावरांना डोंग्याला बांधून प्रवास करत तेलंगणात तस्करी करतात. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा प्राणी अधिनियम १९९५ च्या विविध कलमानुसार गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.