हिंगणघाट :-समाजात कन्येचा जन्मदर वाढावा, त्या उद्याच्या सक्षम नागरीक व्हाव्यात, महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे आज ३ जानेवारीला विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार याचे शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
सदर उपक्रमाचे आयोजन नजीकच्या बोरगांव (नांदगाव) येथील अशोक देवाडे कन्या परिवार सहयोग प्रतिष्ठानाचे वतीने आ. कुणावार यांचे जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
या उपक्रमाचे माध्यमातून गरजू माता, भगिनींना काही जीवनावश्यक वस्तूंचे वितरणसुद्धा करण्यात येणार असून येथील ग्रामीण भागात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक देवाडे यांनी दिली.
आ. कुणावार यांनी या लोकोपयोगी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
उपरोक्त लोकार्पण सोहळ्याचे वेळी
लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांचेसह अशोक देवाडे, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे ,रामदास गेडेकर,गोपाल ठवरी, रविकांत डोळसकर,शरद गौळकर,चंदुभाऊ मावळे,गणेश उगे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.