मूल :- जुनासुर्ला येथील तलाठी एकनाथ गडेकर यांनी जुनासुर्लाचे साईनाथ बुग्गावार यांचेे विरूध्द केलेली तक्रार निराधार आणि व्यक्तीगत वैमनस्यातुन खोटी असुन प्रशासकीय दडपनातून साईनाथ बुक्कावार यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप रूपेश मारकवार यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
तलाठी गडेकर यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत राजगडवासीय गावकरी जाणुन असून मुळात तलाठी गडेकर हे हेकेखोेर प्रवृत्तीचे असुन ते राजगड साजाला असतांना येथील लोकांना नाहक त्रास देण्याचेच काम त्यांनी केले आहे. प्रत्येक कामात अडवणुक करून पैसे मागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे गावकरी त्यांना नेहमीच शिव्याशाप देत असतात. जुनासुर्ला येथील प्रकरणात नक्की काय घडले याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. मात्र तलाठी गडेकर यांनी दाखल केलल्या तक्रारीतील आरोप खरे नाही. गडेकर यांचा स्वभाव स्वतःला मोठे म्हणुन घेण्याच्या असल्याने आपल्या बचावात ते कुणाचाही नाहक बळी देतात. ते स्वतःला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपमा देऊन माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही अशा वल्गना करीत असतात. जुनासुर्ला प्रकरणाशी माझे सरळ कोणतेंही संबध नाही मात्र शासनाच्या कायदयाच्या चुकीचा पध्दतीने वापर करून निर्दोष लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. साईनाथ बुग्गावार यांचे विरूध्द लावलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असुन याप्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठी गडेकर यांचे विरूध्द प्रशासकीय कारवाई करावी. या प्रकरणाबाबत जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेषी भ्रमनध्वनीव्दारे बोलणे झाले असुन साईनाथ बुग्गावार यांचे विरूध्द पोलीसांनी लावलेल्या कलमाच्या बाबत माहिती घेऊन त्या मागे घेण्याची मागणी केली आहे अशी माहिती रूपेश मारकवार यांनी दिली आहे.