पुलगाव :-जय महाकाली शिक्षण संस्था द्वारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल नाचणगांव पुलगांव येथे तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे चे आयोजन दिनांक २८ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक धनंजय शिंगणजुडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलीत करून करण्यात आली. ध्वज मार्च करून विद्यार्थ्यांनी आप आपल्या हाऊसचे प्रदर्शन करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय शिंगणजुडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्व समजावून सांगितले .या क्रीडा महोत्सवात नर्सरी पासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .या क्रीडा उत्सवात राधाकृष्णन हाऊस, विवेकानंद हाऊस, पटेल हाऊस, टॅगोर हाऊस यांनी खो-खो,क्रिकेट, कबड्डी,लंगडी, रस्सीखेच,१०० मीटर दौड ,फुटबॉल, बॉल रेस इत्यादी खेळामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. पुस्तकांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी आनंद पूर्वक आणि शिस्तीत राहून खेळामध्ये आपला सहभाग दर्शवला. क्रीडा स्पर्धा शाळेच्या चार हाऊस मध्ये घेण्यात आली .
ज्यामध्ये सर्वांनी आपला उत्कृष्ट सहभाग दर्शवला. मुख्याध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी बनवल्या बद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल आणि स्मिता याचे अभिनंदन केले . कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी स्नेहा गवारले आणि अरहान शेख यांनी केले.