मूल, प्रतिनिधी
धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी मूल येथील तीन खेळाडू रवाना झाले आहेत. या खेळाडूंनी वर्धा येथे पार पडलेल्या नागपूर विभागस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर प्रवेश मिळवला आहे.
सेंट अँस हायस्कूलची विद्यार्थिनी यशस्वी संदीप येनुगवार (१४ वर्षांखालील वयोगट, -५० कि.ग्रा.), माउंट कॉन्वेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी नैतिक चंदू धोबे (१७ वर्षांखालील वयोगट, ५८ कि.ग्रा.) आणि जैद सलीम शेख (१४ वर्षांखालील वयोगट, ६० कि.ग्रा.) हे खेळाडू नागपूर विभागाचे नेतृत्व करतील.
या खेळाडूंना कराटे कोच साहिल खान यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांचा प्रवास २७ नोव्हेंबर रोजी चंद्रपूरवरून धुळे येथे सुरू झाला. खेळाडूंना त्यांच्या पालकांसह सेंट अँस हायस्कूल व माउंट कॉन्वेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कराटे अँड फिटनेस क्लबचे प्रशिक्षक इम्रान खान व निलेश गेडाम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धेतही खेळाडू चमकदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.