अहिल्यानगर : सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला आणि साधुसंतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नाव घेतले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला हा जिल्हा राज्याच्या राजकारणातही महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे 39 हजार 650 मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीच्या एकसंघ होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना 78 हजार 255 मिळाले. पहिला फेरीपासून संग्राम जगताप यांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी शेवटच्या फेरी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि विजय निश्चित केला.