गोंडपिपरी-:- महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०२१ या कालावधीची धकबाकी मंजुर करण्यासंदर्भात त्यांच्या संघटनांनी शासन तथा प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला.प्रत्यक्ष भेटी सुध्दा घेतल्या.मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आपल्या न्याय मागण्यासाठी एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपुरातील एफडीसीएम कार्यालयासमोर काल (दि.१) पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.आज दुसऱ्या दिवशी गोंडपिपरी तालुक्यातील वनकर्मचाऱ्यांसह २० सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित मधील अधिकारी व कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०२१ या कालावधीची वेतनातील थकबाकी मिळणेकरीता त्यांनी मागील दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला.अजूनही प्रयत्न सुरू आहेत.याकरिता कर्मचाऱ्यांनी महसूल व वनविभागाचा शासन निर्णय क्र.एफडीसी २०१९/प्र.क्र.२९/फ-५ दि.१६.०९.२०२१,याच विभागाचा दुसरा शासन निर्णय क्र. एफडीसी-२०२२/प्र.क्र.०७/फ-५ दि.१६.०१.२०२३ आणि त्यांच्या संघटनेचे पत्र क्र.१०३,दिनांक ०२.११.२०२३,११३,दिनांक १०.११.२०२३ चा संदर्भ जोडला आहे.शासन निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादीत मधील कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी अंतर्गत दिनांक १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०२१ या कालावधीच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत प्रस्तावासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली.सदर समिती गठीत होऊन दहा ते अकरा महिन्याचा कालावधी लोटला आहे.दरम्यान अजूनपर्यंत या उपसमितीद्वारे एकही बैठक घेण्यात आली नाही.अशावेळी १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०२१ पर्यंत ६३० अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले.सद्या त्यांना केवळ दोन हजार ते तीन हजार एवढेच निवृत्तीवेतन मिळत असल्यामुळे तुटपुंज्या पगारावर जगताना त्यांची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती बिकट झाली आहे.कर्मचारी मानसिक विवंचनेत सापडले आहेत.शासन व प्रशासनाकडे सलग दोन वर्षापासून त्यांचा पाठपुरावा सुरू असतांना त्यांच्याकडून विषयांकीत प्रकरणी दुर्लक्ष होत आहे.एफडीसीएम कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून तो निकाली काढावा,याकरीता ६ नोव्हेंबर २०२३ ते ८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत काळया फिती लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.परंतू आजतागायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही.त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेद्वारे कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल (दि.१) पासून एफडीसीएमचे कार्यालयासमोर अत्रत्याग सत्याग्रह सुरू केले आहे.सदर प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करुन न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी.पाटील,केंद्रीय सचिव एस.एस.राठोड यांनी केली आहे.त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री व वनमंत्र्यांना सादर केले आहे.