अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश तिरुपती लेंनगुरे यांच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले.त्यात जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुकसह इत्यादी आवश्यक कागदपत्रे जडून खूप मोठे नुकसान झाले असता.अश्या परिस्तिथीची सदर बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच कुटूंबातील प्रमुख व्यक्ती नामे सुरेश लेंनगुरे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून आर्थिक मदत देण्यात आले.
प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला धिर देत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अडीअडचणी किंवा असे अचानक झालेल्या अपघाता वेळी सहकार्य करणे गरजेचे असल्याचं बोलले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य कु.सुनीता कुसनाके,भास्कर तलांडे माजी प.स.सभापती अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी सुधाकर तिम्मा आ.वि.स.तालुका अध्यक्ष ,अशोक येलमुले उपसरपंच,भामरागड ,हनमंतु लसमय्या ठाकरे,संजीव चेकनलवार,श्रीनिवास लेंडगुरे,विलास बोरकर,गुलाब देवगडे, दासू कांबडे, सुनील रत्नम,राजाराम दुर्गे,प्रशांत गुरनुले,महेश गुरनुलेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते – गावातील नागरिक उपस्थित होते.