प्रतिनिधी यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजेच राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले होते.
मागील १२ वर्षापासून शासन स्तरावर ग्रामपंचायत संगणक परीचालकांचा विविध मागण्या प्रलंबित असून विविध आंदोलने, मोर्चे तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा शासन आणि कंपनीच्या वतीने संगणक परीचालकांची बोळवण केली.शासनामार्फत माजी सनदी अधिकारी अभय यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या समितीने ग्रामपंचायत कर्मचारी सुधारित आकृतिबंधाची शिफारस केली असून त्या अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये क्लर्क कम डाटा एन्ट्री पदावर सरसकट नियुक्ती करावी, आकृतीबंधात समाविष्ट करण्यास वेळ लागत असल्यास किमान मासिक वीस हजार वेतन देणे, टार्गेट पूर्ण करण्याच्या नावावर बोगस कामे करवून न घेणे, ग्रामविकासाच्या परवानगी शिवाय ईतर विभागाची कामे देण्यात येऊ नये तसेच मागील थकीत असलेले वेतन तात्काळ देण्यात यावे या मागण्यांसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले होते.
शासनामार्फत मागील १२ वर्षात निवेदने, मोर्चे, आंदोलने करून सुद्धा शासनाने दखल घेतली नसल्याने यापुढील आंदोलने हे तीव्र स्वरूपाची करणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षच्या वतीने कळविण्यात आले आहे.त्याच अनुशंगाने दिनांक २१ नोव्हेंबर ला पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले व दिनांक ०४ डिसेंबर रोजी राज्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्य यांचे घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार त्यानंतर ही मागण्या मान्य नकेल्यास हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर ११ डिसेंबर रोजी मोर्चा काढणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड,यशवंत पवार,युवासेनेचे सुमित खांदवे,पुरुषोत्तम राठोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम,उबाठा गटाचे संतोष ढवळे,आव्हान संघटना जिल्हाध्यक्ष पडदुमन जवलेकर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांनी भेट देऊन पाठीबां दिला
यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजकुमार महल्ले,पुसद अध्यक्ष अरुण बरडे,उमरखेड देवेंद्र चव्हाण,महागाव जयकुमार मिरासे, आर्णी दिनेश पुसंडे, बाबूलगाव सोम धवणे, कळंब स्वप्नील धनरे,वणी राजकुमार वडकर, मारेगाव देवा किनाके,नेर निलेश आडे,दिग्रस आकाश पाईकराव,यवतमाळ सुरज जयस्वाल,झरी राहुल दांडेकर, राळेगाव बशीर शेख,केलापूर चंद्रकांत कोडापे
शरद पवार,विनोद सोनटक्के,सचिन पत्रकार,विकास राऊत,अझर खान,चंद्रकांत सातपुते, सचिन देवतळे,अतुल राऊत,गणेश असुटकर,प्रमोद पवार,राजू राठोड,गौरव इंगळे मतीन शेख,सुनीता खंडारे,संगीत बदूरकर, दीपाली चरडे
जिल्ह्यातील आदी संगणक परिचालक उपस्थित होते.