गोंडपिपरी –
श्री.साई क्रीडा मंडळ लिखितवाड्याच्या वतीने आयोजित केलेल्या तिन दिवसीय दिवसरात्रकालिन पुरुषाचे कब्बडी सामन्यांचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते रीतसर उद्घाटन केले.
कब्बडी हा खेळ आपल्या मातीशी संलग्न असुन खेळ हा सांकेतिक आहे. प्रत्येक क्षेत्रात यश अपयश लागून असते.यश मिळाले म्हणून माजायचे नाही आणि नाही मिळाले म्हणून लाजायचे नाहीत. अपयश ही यशाची खरी पायरी आहे त्यामुळे खेळाळूनी सांकेतिक खेळ खेळत आपले कौशल्य दाखवायचे आहे.
मध्यंतरीच्या काळात कबड्डीकडे दुय्यम भावनेने बघण्याचा एक प्रवाह चालला होता. परंतू मागील सात-आठ वर्षांपासून प्रो-कबड्डी सारख्या भव्य व दिव्य स्पर्धांच्या माध्यमातून आता कबड्डीचे दिवस पालटले आहेत. सद्यस्थितीत प्रो-कब्बडी च्या माध्यमातून देशात कब्बडी ला नावलौकिक प्राप्त झाले.
सुदृढ आरोग्य आणि उत्तम सांघिकशक्तीचे दर्शन कबड्डी सारख्या खेळातून नेहमीच घडत असते. याठिकाणी आलेल्या सर्व कबड्डी संघांनी उत्तमरीत्या आपल्या क्रिडाकौशल्याचे प्रदर्शन करावे, आणि प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करावा, विजयाकरीता सर्वांनाच माझ्या शुभेच्छा ! ! भावी पुढिल वाटचालीस आपण पुन्हा यश प्राप्त कराल अशी पण व्यक्त करते असे प्रतिपादन याप्रसंगी माजी आमदार संजय धोटे यांनी उदघाटनिय भाषणात बोलताना केले.
कार्यक्रम प्रसंगी यावेळी सह उदघाटक तथा नगरपंचायत गोडपिपरी नगरसेवक चेतनसिंह गौर ,अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार ,महेंद्रसिंग चंदेल, ग्रामपंचायत सदस्य तथा सहसंयोजक पंचायत राज व ग्रामीण विकास विकास विभाग नागपूर कोमल फरकडे , भाजपा जेष्ट नेते दिपक बोगिनवार चेकलिखितवाडा सरपंच पुष्षा राऊत ,प्रशांत येल्लेवार , कुउबास संचालक सदिप पौरकर , हरिदास मडावी, प्रभाकर कोहपरे , प्रतिमा चंद्रगिरीवार,भाग्यश्री आदे,विनोद आदे..रेखा कोहपरे, वामणराव गेडाम ,रविन्द्र पाल यांचेसह गावातील नागरिक , क्रिडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.