शिवनीपाट येथे 71 गाव संघटनांचा सहभाग
अहेरी : तालुक्यातील शिवनीपाठ येथे संविधान दिनाच्या दिवशी 71 गाव संघटना तथा शिवनीपाठ गाव समितीच्या वतीने काली कंकाली चौकात सल्ला गांगरा शक्ति स्थापना, सप्तरंगी ध्वजारोहण, सामूहिक विवाह सोहळा व सामाजिक- सांस्कृतिक प्रबोधन मेळावा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे,व अजय कंकडालवार,प्रमुख पाहुणे म्हणुन,पंसच्या माजी उपसभापती सोनाली कंकडालवार, माजी पस उपसभापती गीता चालूरकर, नगरपंचायतीच्या अध्यक्ष रोजा करपेत , तेलंगणाचे नेहरू मडावी, विचारवंत विश्वेश्वर दरो, माजी जिप सदस्य अजय नैताम, विविध गावचे सरपंच व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सकाळी धार्मिक विधी व मूठ पूजाकरण्यात आली.यावेळी भूमक म्हणून तुकाराम शेडमाके, डॉ कुसणाके, संजू सीडाम, डॉ. कोडापे हजर होते. त्यानंतर सप्तरंगी ध्वजारोहण करून सामूहिक विवाह सोहळा मंत्रचाराच्या व अजय भाऊ कंकडालवार यांच्या उपस्थितीत पार पडला. सायंकाळी सह भोजनानंतर गोंडी सांस्कृतिक नृत्य व गोंडी कलाकारांचा सत्कार व प्रबोधन मेळावा घेण्यात आला. सत्कारमूर्ती म्हणून गायक सुरेश वेलादी, विकास कुळमेथे, पांडुरंग मेश्राम तसेच तेलंगाना व उटनुरचे अनुक्रमे नरेश सोयाम, प्रवीण वलका यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, समाजाचे पदाधिकारी, बहुसंख्य नागरिक व पाहुणे उपस्थित होते.
शीवणीपाट येथील सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम व सामूहिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सत्यवान तलांडे, उपाध्यक्ष दिनेश आलम ,सचिव देविदास पोर्टेट , हनुमंत कुळमेथे, सदाशिव कोडापे व इतर सदस्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत व परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मधुकर वेलादी व दशरथ तलांडी यांनी काम पाहिले.
सोबतच मंचावर एटापलीचे तालुकाध्यक्ष बंडू मट्टामी, माजी पस सभापती सुरेखा आलम, छायाताई पोर्टेट, ज्योती सडमेक, विलास गलबले, महेश बांकेवार, खमणचेरुचे सरपंच सायलू मडावी, वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी, कोठारीच्या सरपंच रोशनी कुसणाके, माजी सभापती नामदेव कुसणाके, कालिदास कूषणाके, अशोक एलमुले, गुलाबराव सोयाम, प्रमोद आत्राम मंचावर उपस्थित राहून विविध गावांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर वेलादी, सरपंच उमेश कडते, रामलू कुडमेथे यांनी केले.